Pimpri News : पिंपरी : पीएच.डी. च्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपये लाच घेणार्या डॉ. शकुंतला माने या सांगवीतील घोलप महाविद्यालयामधील प्राध्यापिकेची मार्गदर्शक म्हणून असलेली मान्यता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने रद्द केली आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.करणार्या आठ विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अन्य मार्गदर्शकाकडे सोपविण्यात आली आहे.
३० मार्च रोजी या प्राध्यापिकेला २० हजार रुपयांची लाच आपल्या विद्यार्थ्याकडून घेताना पकडण्यात आले होते.
या प्रकरणी तक्रार देणारी व्यक्ती प्राध्यापक असून त्याने अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळविण्यासाठी आपला प्रबंध विद्यापीठाकडे ऑनलाईन सादर केला होता. या प्राध्यापकाला मार्गदर्शक म्हणून शंकुतला मानेंची नियुक्ती करण्यात आली होती. तक्रारदार प्राध्यापकाचा रिजेक्ट झालेला प्रबंध पुन्हा सुधारणा करून सादर करण्यासाठी परवानगी देण्याकरिता शकुंतला माने हिने त्याच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्या प्राध्यापकाने अॅन्टीकरप्शन खात्याकडे तक्रार केली. या खात्याच्या अधिकार्यांनी सापळा लावला. ३० मार्च २० हजार रुपयांची लाच घेताना शकुंतला माने हिला ‘रंगेहाथ’ पकडण्यात आले होते.
या सर्व प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रतिमा डागाळली गेली. परिणामी विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Discussion about this post