Pimpri News : पिंपरी : वाकड येथील एका तरुणीला आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून एका व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याकडून पैसे उकळले. तसेच, शरीरसुखाची मागणीही केली. या प्रकरणी त्या तरुणीने वाकड पोलीसठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून त्या तोतया उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम राठोड (वय-40 रा. चिंचवड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर 354(ड), 384, 385, 170, 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसर्याच एका उपनिरीक्षकाचा फोटो वापरला. व्हॉट्सअॅप आणि मोबाईल कॉलच्या माध्यमातून तक्रारदार तरुणीशी ओळख वाढविली. तिला आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासविले. तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे फोटो आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे उकळले. तसेच, शरीरसुखाची मागणी केली.
Discussion about this post