व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने सोमवारपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतही प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली आहे. निवडणुका होईपर्यंत महापालिकेचा कारभार तांत्रिकदृष्ट्या आयुक्त राजेश पाटील यांच्या हाती राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची पंचवार्षिक मुदत १३ मार्च रोजी संपुष्टात आली. या मुदतीत महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेवर प्रशासकीय राजवट आजपासून लागू झाली आहे.
महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यासह महापालिकेतील पदाधिकऱ्यांनी महापालिकेची वाहने प्रशासनाकडे जमा केली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची सुरक्षा व्यवस्थाही परत केली आहे.
Discussion about this post