व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी(प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने अतिदुर्गम भागात असलेल्या दुधवन( ता. मुळशी) या गावासाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली. रोटरी क्लब निगडीने ८ लाख रुपये खर्च करून पाण्याची सोय केल्याने दुधवन गावातील २२० ग्रामस्थांची तहान भागवण्याचे कार्य केले आहे.दूधवन गाव हे लवासा पासून अंदाजे १२ किमी तर घोटवडे पासून ३५ किमी अंतरावर उंच डोंगर भागात आहे.
दुधवन हे गाव डोंगर भागात असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्य हे बैलगाडीच्या साहाय्याने वर घेवून गेले.बांधलेली टाकी अंदाजे १७ हजार लिटर क्षमतेची आहे.स्वातंत्र्य काळानंतर प्रथमच अशी पाण्याची सोय रोटरीने केली असल्याचे समाधान गावकऱ्यांनी व्यक्त केले.
या टाकीच्या उदघाटनप्रसंगी क्लबचे अध्यक्ष हरबिंदर सिंग, कमलजित कौर,सेवा संचालक गणेश भालेराव,संज्योत भालेराव, सरपंच संगीता मरगळे, सदस्य मारुती कोकरे, माजी उपसरपंच तानाजी मरगळे,रामाबाई कचरे, सगुबाई मरगळे,कोंडाबाई मरगळे, रामभाऊ ढेबे, कोंडिबा कचरे,फुलाबाई मरगळे, विठ्ठल मरगळे आदी उपस्थित होते
Discussion about this post