व्हीएसआरएस मराठी न्युज –पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना चावी वाटप करण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका भवनात बैठक घेण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त रामदास तांबे यांच्यासह प्रमुख अधिकारी व लाभार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. ज्या लाभार्थींनी नियमाप्रमाणे १० टक्के अनामत रक्कम भरली आहे. त्यांना तात्काळ घरांचा ताबा देण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी अनामत रक्कम भरावी, या करिता प्रशासन आवश्यक कार्यवाही करणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सदनिका हस्तांतरण प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ४४२ लाभार्थींना हक्काचे घर मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. सुरूवातीला महापालिका भवनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि आमदार लांडगे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी पाहणी करुन काम पूर्ण करण्यासाठी ‘कालबद्ध कार्यक्रम’ हाती घेतला होता.
Discussion about this post