व्हीएसआरएस मराठी न्युज -अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे ठिकाण तसेच कालावधी निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली, या बैठकीत अधिवेशनाचा 22 दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला.
प्रलंबित बिले आणि मागण्यांवर पाच दिवस चर्चा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा वर्ष 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प 11 मार्च रोजी मांडला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर दिली.
Discussion about this post