व्हीएसआरएस मराठी न्युज सोलापुर-ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या लहान मुलीसाठीकॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठेपणा दाखवत लहान मुलीसाठी स्वतःचे हेलिकॉप्टर दिल्याची घटना आज सोलापूरात घडली आहे.
उंजल तुकाराम दासी असं या लहान मुलीचे नाव आहे. उंजल हृदय विकाराच्या उपचाराकरीता मुंबई येथे जाण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून नाना पटोले यांनी स्वत: चं हेलिकॉप्टर मुलगी आणि तिच्या आई वडिलांना मुंबईला जाण्यासाठी दिलं. नाना पटोले यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाना पटोले हेलिकॉप्टर ऐवजी रेल्वेने मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती प्रणिती शिंदेना मिळाली त्यांनी तत्काळ नाना पटोले यांच्याशी संपर्क केला.
आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूरमधील तुकाराम दासी, रा. सुनिल नगर, एम. आय. डी. सी. येथे राहणाऱ्या व्यक्तीने भेट घेतली आणि आपल्या लहान मुलीची तात्काळ शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असून त्याची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान, उंजल दासी हिला हृदय विकाराच्या आजार असल्याची देखील सदर व्यक्तीने आमदार शिंदे यांना दिली होती. त्यावरून आमदार प्रणिती शिंदे यांनी नाना पटोले यांना उंजल दासी याला उपचारासाठी पाठविण्याकरीता स्वतःचं हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. त्यानुसार नाना पटोले यांनी स्वतःच्या हेलिकॉप्टपने उंजल तुकाराम दासी हिला मुंबई येथे हृदय विकाराच्या उपचाराकरीता पाठविले व स्वतः रेल्वेले मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले यांना मी सदर मुलीची कैफियत मांडल्यावर त्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर त्या मुलीला मुंबईला जाण्यासाठी दिलं आणि आता ते सिद्धेश्वर एक्स्प्रेसनं मुंबईला जातील. ती मुलगी बरी होऊन सोलापूरमध्ये परत येऊदेत आणि नानाभाऊंना आशीर्वाद मिळू देत, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी या विषयी काँग्रेसच्या मेळाव्यात माहिती दिली आहे.
Discussion about this post