व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचण येऊ नये, अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग तयार करत आहे. परंतु हे काम अंत्यत संथगतीने सुरू आहे. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने व संथगतीने काम करत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. येथील भुयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निगडी येथे पादचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, त्यांना वाहनांचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने येथे भुयारी मार्ग निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतु संबंधित कामाचा ठेकेदाराने हे काम वेळेत पूर्ण केले नाही. ८ जून रोजीच कामाची मुदत संपली असून देखील अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सध्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला केला आहे. परंतु भुयारी मार्गावर छत टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. परंतु येथील काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
8 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
Discussion about this post