व्हीएसआरएस मराठी न्युज -खडकवासला येथील हवेली तालुक्यामधील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत धरणात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले पण सोळा ते सतरा वर्षांच्या दोन मुलींचा शोध लागला नाही.
स्थानिकांनी या घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच खडकवासलाचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवालदार दिनेश कोळेकरांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.
Discussion about this post