Uttar Pradesh : अयोध्या : प्रभू श्रीरामचे जन्मस्थळ अयोध्येमध्ये आज रामनवमीनिमित्त मोठी लगबग सुरू आहे. प्रथम रामललाच्या मूर्तीला समंत्रोपचार अभिषेक केला गेला असून त्यानंतर सूर्यतिलक होणार आहे. काही आरसे, भिंगे आणि धातूनलिका यातून जात सूर्यकिरणे श्रीरामाच्या मूर्तीच्या ललाटावर काही काळ स्थिर होणार आहेत.
या समारोहाची तयारी पूर्ण झाली असून रामनवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये सुमारे ३० लाख भाविक गोळा होतील असा प्राथमिक अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामलला यांच्या ‘सूर्य टिळका’ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रामनवमीला 30 लाखांहून अधिक भाविक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे.
या संदर्भात मंदिर न्यासाच्यावतीने करण्यात आलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मंदिरात रामललाच्या मूर्तीला सरकारच्यावतीने अभिषेक करण्यात आला. अयोध्येत मोठ्यासंख्येने भाविक दाखल झाले असून त्यांनी शरयूस्नानासाठी गर्दी केली होती. पहाटे ३ वाजून २० मिनिटांनंतर दर्शनासाठी मंदिराची द्वारे खुली करण्यात आली.
या सर्वांचे भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून मंदिरन्यासातर्फे १०० आणि सरकारकडून ५० एलईडी स्क्रीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
Discussion about this post