Pune News : पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी व्हावी या हेतूने रेल्वेने पुणे ते झाशी मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या २२ फेर्या होणार आहेत. ही माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
या गाडीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पुणे-वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन-पुणे (22 ट्रिप)
गाडी क्रमांक 01923 पुणे – वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन साप्ताहिक उन्हाळी विशेष दिनांक 21.4.2024 ते 30.6.2024 (11 ट्रिप) दरम्यान दर रविवारी पुण्याहून 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01924 वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन – पुणे साप्ताहिक उन्हाळी विशेष दिनांक 20.4.2024 ते 29.6.2024 दरम्यान (11 ट्रिप) प्रत्येक शनिवारी वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन येथून 12.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बीना आणि ललितपूर.
रचना:एकूण 17आयसीएफ कोच: एक एसी 2- टियर, 5 एसी 3-टियर, 5 स्लीपर आणि 6 सामान्य द्वितीय श्रेणी सहित दोन लगेज आणि गार्ड ब्रेक व्हॅन .
आरक्षण: गाडी क्रमांक 01923 साठी बुकिंग दिनांक 18.4.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.com वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Discussion about this post