पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोलीनजिक एका डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने डंपरने एका ट्रकला मागून धडक दिली त्यानंतर एक बस, कार आणि टेम्पो यांना घासत गेला. या अपघातात डंपरचा चालक आणि सहका-याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे ट्रकमध्ये असलेल्या पुठ्ठ्यालाला आग लागली. या सर्व प्रकारामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अपघाताचे वृत्त कळताच पोलीस, आयआरबी, अग्निशमन, देवदूत या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूस केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघाताचा तपास खोपोली पोलीस करत आहेत.
Discussion about this post