पिंपरी : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत खोपोलीनजिक दि. १० डिसेंबर रोजी पहाटे एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला. या अपघातात बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.ही बस मुंबईहून कोल्हापूरकडे जात होती.
या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस, आयआरबी, अग्निशमन, देवदूत या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे समजते.
Discussion about this post