व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येत असून, या योजनेसाठी 2020 पासून 15 हजार 147 फेरीवाल्यांनी पालिकेकडे अर्ज केले होते.
शहरातील 15 हजार 147 फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 9 हजार 754 जणांचे अर्ज मंजूर झाले असून 7 हजार 362 फेरीवाल्यांनी स्वनिधीचा लाभ घेतला आहे. यापैकी 7 हजार 51 जणांनी प्रथम कर्ज म्हणून 10 हजार रूपये, प्रथम कर्जाची परतफेड केल्यानंतर 2 हजार 698 जणांना 20 हजार रूपये तर द्वितीय कर्ज रक्कमेच्या परतफेडीनंतर 5 जणांना पन्नास हजार रूपयांचे कर्ज मिळाले आहे. तसेच 3 हजार 593 जणांचे अर्ज बॅकेकडे अर्ज प्रलंबित आहेत. 1800 फेरीवाल्यांनी अर्ज करून नंतर प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे विविध बॅंकांनी महापालिकेकडे अर्ज परत केले आहेत.
फेरीवाल्यांना पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे स्वतः विविध बॅंकांच्या प्रतिनिधीशी बैठका घेत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना त्वरीत या योजनेला लाभ मिळण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्वनिधी योजनेमध्ये बॅंकेद्वारे प्रथम कर्ज दहा हजार, प्रथम कर्जाचे परतफेड केल्यानंतर वीस हजार रूपये, द्वितीय कर्ज रक्कमेच्या परतफेडीनंतर पन्नास हजार रूपये कर्जाची रक्कम देण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी कर्ज रकमेची विहीत मुदतीत परतफेड केल्यास कर्ज रकमेच्या व्याजावर 7 टक्के अनुदान मिळते.
Discussion about this post