व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन (पीडीएमबीए) वतीने राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा २०२३ या स्पर्धेसाठी सह आयोजकत्व स्विकारले आहे.
त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २० लाख रकमेचा धनादेश पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांचे नावे या संस्थेचे सह कार्यवाह राजीव बाग यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, राजेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते.
Discussion about this post