Pimpri News : पिंपरी : चिखलीतील एका तरुणीला इन्स्टाग्रामवर बनलेल्या एका मित्राने तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी त्या तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
शाहनवाज सिराजुद्दीन अन्सारी (वय २० रा. सानपाडा, नवी मुंबई, मूळ गाव सलीमपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार व्यक्तीच्या मुलीची आरोपीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्याने तिचा फोटो डीपीवर ठेवला. त्यानंतर फिर्यादीच्या मुलीला सांगितले की तुझ्या डीपीबद्दल माझ्या मित्राने अपशब्द वापरले म्हणून मी त्याचा खून केला. आता हे प्रकरण मिटविण्यासाठी मला पैशांची गरज आहे नाहीतर पोलीस तुझ्या घरी पोहोचतील. आणि जर पैसे दिले नाहीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांनाही संपवून टाकीन.
त्याच्या या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने त्याला १ लाख रुपये रोख आणि ५ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदविली.
Discussion about this post