व्हीएसआरएस मराठी न्युज –हिंद कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डाॅ.कैलास कदम, उपाध्यक्ष शांताराम कदम, विठ्ठल गुंडाळ, गोरख जगताप, महेश काशीद, सुभाष मस्तुद, मनोज कुऱ्हाडे, रणधीर सावंत, पांडुरंग भोरे, गोरख जगताप, जयदीप भंडारे, पांडुरंग लोंढे आदींसह कामगार उपस्थित होते.
यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना डाॅ.कैलास कदम म्हणाले की, देशाच्या जीडीपीमध्ये कामगारांचे योगदान महत्वपुर्ण आहे. दरवर्षी देशात दोन कोटी रोजगार निर्माण करु असे सांगून केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने कामगारांविरोधी कायदे केले. त्यामुळे कोट्यावधी कामगार बेरोजगार झाले. त्यामुळे पुढील पिढीचे आर्थिक, सामाजिक आणि कौटूंबिक स्थैर्य नष्ट होणार आहे.
यापुढे कदम म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या कामगारांविरोधी कायद्यांच्या विरोधात सर्व कामगार संघटनांनी व कामगारांनी एकत्रित येऊन लढा लढला पाहिजे.
Discussion about this post