Pune News पुणे : पुणे शहरात खडक पोलीसठाण्याच्या अखत्यारीतील लोहियानगर चौकीत ५ एप्रिल रोजी पहाटे एका पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याने पुणे पोलीसदल हादरले आहे.
भरत दत्ता आस्मर असे मृत पोलिसाचे नाव आहे. सुमारे आठ ते दहा वर्षे ते पोलीसदलात कार्यरत होते. आस्मर रात्रपाळीसाठी लोहियानगर पोलीसचौकीत कामावर होते. पहाटेच्या सुमारास चौकीत कोणी नसताना एका खोलीमध्ये जाऊन आतून दरवाजा बंद करून घेत त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Discussion about this post