Pune News : पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळी विशेष गाड्यांच्या जादा फेर्या करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली. या जादा गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पुणे-दानापूर-पुणे अनारक्षित विशेष (6 ट्रिप)
गाडी क्रमांक 01415 पुणे- दानापूर अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी दिनांक 20.4.2024, 24.4.2024 आणि 28.4.2024 रोजी पुण्याहून 19.55 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता दानापूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01416दानापूर – पुणे अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी दिनांक 22.4.2024, 26.4.2024 आणि 30.4.2024 रोजी दानापूर येथून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना : एकूण 22 आयसीएफ कोच:
20 स्लीपर (अनारक्षित) आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन
2) पुणे-गोरखपूर-पुणे (6 ट्रिप)
गाडी क्रमांक 01419 पुणे- गोरखपूर दिनांक 20.4.2024 , 24.4.2024 आणि 28.4.2024 रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.50 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01420 गोरखपूर – पुणे विशेष दिनांक 21.4.2024, 25.4.2024 आणि 29.4.2024 रोजी गोरखपूरहून 18.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुण्याला 06.40 वाजता पोहोचेल.
थांबे : हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
रचना : एकूण 22 आयसीएफ कोच: 1 फर्स्ट कम AC-2 टियर, 8 AC -3 टियर, 6 स्लीपर, 7 सामान्य द्वितीय श्रेणी सामानासह 2 गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर.
3) पुणे-दानापूर-पुणे विशेष (8 ट्रिप)
गाडी क्रमांक 01417 पुणे- दानापूर उन्हाळी विशेष गाडी दिनांक 18.4.2024, 21.4.2024 25.4.2024आणि 29.4.2024 रोजी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता दानापूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01418दानापूर – पुणे अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी दिनांक 19.4.2024, 22.4.2024, 26.4.2024 आणि 30.4.2024 रोजी दानापूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.45 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा,इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना : एकूण 22 आयसीएफ कोच:
दोन एसी -3टियर, 18 स्लीपर आणि दोन सामान सहित गार्ड ब्रेक व्हॅन
आरक्षण : गाडी क्रमांक 01419 आणि 01417 साठी बुकिंग दिनांक 17.4.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.com वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन रेल्वेने केले आहे.
Discussion about this post