Pune News : लोणावळा : लोणावळा शहरात असलेल्या एका बंगल्यात ६ एप्रिल रोजी रात्री उशीरा साऊंडसिस्टीम लावून काही मुलींना अश्लील हावभाव करून नृत्य करावयास लावले जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीसपथकाने त्या बंगल्यावर छापा मारून ९ जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर लोणावळा शहर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरात असलेल्या एस ४ या बंगल्यात हा प्रकार सुरू होता. या बंगल्याच्या आवारात साऊंडसिस्टीमच्या तालावर अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी छापा घालून कारवाई केली.
अधिक तपास उपनिरिक्षक श्रीकांत जोशी करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर अधिक्षक रमेश चोपडे, सहायक अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर निरीक्षक सुहास जगताप यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, हवालदार मयूर आबनावे, नाईक शिंदे, शिपाई सोनवणे, निंबाळकर, शिंदे, येळवंडे, घोंगडे, पवार यांनी केली.
Discussion about this post