दुर्घटनेबाबत घेतली सविस्तर माहिती
पिंपरी : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दि. १० डिसेंबर रोजी तळवडे येथील शिवराज एन्टरप्रायझेस या कारखान्याला भेट देऊन तेथे दोन दि. ८ डिसेंबर रोजी घडलेल्या स्फोटासंदर्भात माहिती घेतली. या दुर्घटनेत ६ महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. तर, काल उपचारादरम्यान अन्य दोन जखमींचा मृत्यू झाला.
गोऱ्हे यांच्या भेटीच्यावेळी आमदार उमा खापरे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, यांच्यासह पालिकेचे आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल दि. ९ डिसेंबर रोजी ससून रुग्णालयाला भेट देऊन या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली होती. उपचारामध्ये कोणतीही हयगय केली जाऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिली होती. आज घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी दुर्घट्ना कशी घडली याची माहिती घेतली. प्रशासनाला सूचना केल्या.
Discussion about this post