व्हीएसआरएस मराठी न्युज –देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस १५ जानेवारी हा यापुढे राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्यात केली.
तसेच क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत एक लाखावरून तीन लाख आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरून पाच लाख रुपये अशी वाढ करण्याचीही घोषणा त्यांनी केली.
क्रीडा पुरस्काराच्या रकमेत झालेली वाढ यंदापासून लागू करण्यात आली असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन कोटी ३८ लाखांचा भार पडणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, म्हाळुंगे येथे सोमवारी क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
Discussion about this post