व्हीएसआरएस मराठी न्युज –पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ गुजरात टायटन्ससमोर होता. CSK संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला आहे. यासह CSK हा IPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK ने 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 10 गडी गमावून 157 धावाच करू शकला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 7 गडी गमावून 172 धावा केल्या. सीएसकेकडून डावाची सुरुवात करणाऱ्या रुतुराज गायकवाडने 44 चेंडूत 60 धावा केल्या. याशिवाय डेव्हन कॉनवेच्या बॅटमधून 40 धावांची खेळीही झाली. त्याचवेळी अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांनी 17-17 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने 22 धावांची खेळी खेळली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने 2-2 बळी घेतले.
पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 172 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच डेव्हॉन कॉनवेने 40 धावांची खेळी केली.
त्याचबरोबर अखेरीस रविंद्र जडेजानेही 22 धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्यकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 20 षटकात 157 धावांवर सर्वबाद झाला. गुजरातकडून शुभमन गिलने 42 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त केवळ राशिद खानने 20 धावांचा टप्पा ओलांडला. राशिदने 30 धावांची खेळी केली.
चेन्नईकडून रविंद्र जडेजा, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडेने 1 विकेट घेतली.
Discussion about this post