व्हीएसआरएस न्युज चिखली-
चिखली येथील महानगरपालिकेचा बस थांबा स्थलांतरित करावा यासाठी वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल यांना पत्र देण्यात आली.
सदर निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की मौजे चिखली येथे संचलनात असलेली मार्ग क्रमांक 323 चिखली ते मनपा बस तसेच बस क्रमांक 326 चिखली ते पिंपरी हा मार्ग पाटील नगर चिखली येथील श्री नागेश्वर विद्यालय हायस्कूल इथपर्यंत वाढविण्यात यावा. सदर ठिकाणी धर्मराज नगर व संतपीठ हा पालिकेचा प्रकल्प चालू असून त्या ठिकाणी लोकसंख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे, सदर मार्ग विस्तारीकरणामुळे या सर्व नागरिकांची सोय होईल.
तसेच सद्यस्थितीत चिखलीगावातील छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात नेहमीच काही ना काही कारणास्तव अनेक छोटी मोठी वाहने लागलेली असतात त्यामुळे बसेसला अडथळा निर्माण होतो व वाहतूक कोंडी होत असते ही बाब नित्याचिच झाले असून त्यावर उपाय म्हणून सदर मार्गाचे विस्तारीकरण लवकरात लवकर व्हावे अशी साहेबांना विनंती करतो.
यावेळी नगरसेवक कुदंन गायकवाड स्वी सदस्य संतोष मोरे,दिनेश यादव ,पाडुरंग साने हे उपस्थित होते