व्हीएसआरएस न्युज अंध महिलेचा आधार असलेला तिचा मुलगा हातातून सुटुन रेल्वे रुळावर पडला त्याला वाचविण्यासाठी आलेल्या
देवदूतसमान पॉईंटमन मयुर शेळके याने स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत धैर्य आणि धाडस दाखवत एका अंध आईच्या चिमुकल्याचे रेल्वे रुळावर प्राण वाचवले.
या अभिमानास्पद व जिगरबाज कृत्याबद्दल मयुर शेळके याचा कर्जत येथील वांगणी रेल्वे स्थानकावर पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने शौर्य गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व रोपटे देऊन कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी स्टेशन मास्तर चंदन कुमार, पॉईंट्समन संदेश खाडे, शशिकांत धुळे, राजू जगताप, सुशांत वंजारी, जाफर शेख, सिद्राम म्हेत्रे, लक्ष्मण उप्पार उपस्थित होते.