व्हीएसआरएस न्युज -संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचं मुंबईच निधन झालं. त्यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी – परंपरा, बालविवाह, अंधश्रद्धा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली होती. केवळ बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सुधारणावादी विचारांनी महाराजांनी संत सेवालाल महाराजांचा वारसा समर्थपणे चालवला होता. डॉ. रामराव बापू महाराज यांना कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून डी. लिट. पदवी प्राप्त होती.
संत रामराव महाराज यांच्या निधनावर माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी त्यांचे स्मरण करीत श्रद्धांजली अर्पण केली. ट्वीटरद्वारे भेगडे म्हणाले, “संत सेवालाल महाराजांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू महान तपस्वी डॉ. श्री. संत रामराव बापू महाराज यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पूज्य संत रामराव बापू महाराजांनी सामाजिक उत्थानासाठी केलेले कार्य कायम पथदर्शक राहील. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो