Pune News : पुणे : प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता, रेल्वेने कोल्हापूर ते गोंदिया अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती पुणे येथील रेल्वेचे जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
या गाडीबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.
कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष
गाडी क्रमांक 01489 कोल्हापूर – गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष दिनांक 22.4.2024 रोजी कोल्हापूरहून 04.00 वाजता सुटेल आणि गोंदियाला दुसऱ्या दिवशी 05.15 वाजता पोहोचेल.
थांबे: मिरज, सांगली, कराड,सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर.
संरचना: 14 स्लीपर + 6 सामान्य द्वितीय श्रेणी + 2लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन = एकूण 22 आयसीएफ कोचेस.
आरक्षण: गाडी क्रमांक 01489 साठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर खुले आहे.
विशेष गाड्यांच्या सविस्तर थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि विशेष गाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Discussion about this post