व्हीएसआरएस न्युज पिंपरी पालिकेला ‘कोविशिल्ड’ लस मिळेना! शनिवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार.18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे.
18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणार!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे या केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस!
प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना येथे कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. तर, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात पहिला, दुसरा डोस दिला जाणार आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.
शहरात आज (शुक्रवारी)220 नवीन रुग्णांची नोंद झाली.
शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 354 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 65 हजार 613 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 878 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 265 रुग्ण गृहविलगीकरणात असून 613 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 48 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 432 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 621 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 51 हजार 545 जणांनी लस घेतली.
Discussion about this post