व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 588 रूग्णालये आहेत. खासगीसह सरकारी व महापालिका रूग्णालयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नोंदणी करून परवानगी घ्यावी लागते. तसेच, दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागते.
ती पद्धत ऑफलाइन आहे. त्यामुळे रूग्णालयत व्यवस्थापनाची दमछाक होते. तसेच, त्यात बराच वेळ वाया जातो. त्यावर तोडगा म्हणून ती पद्धत ऑनलाइन करण्यात येणार आहे.
शहरातील खासगी, शासकीय व महापालिका रूग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून नोंदणी व नूतनीकरण परवाना दिला जातो. सध्या 47 रूग्णालयांचे नूतनीकरण प्रलंबित होते. त्यातील 20 रूग्णालयाचे कामकाज पूर्ण झाले असून, उर्वरित रूग्णालयांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
Discussion about this post