व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा २०२४’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड शहरात भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सखोल स्वच्छता मोहिम घेण्यात आली, यावेळी विधानपरिषद सदस्य मा. उमाताई खापरे, आयुक्त श्री. शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार खोराटे, सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग श्री. यशवंत डांगे, नगरसदस्य तानाजी खाडे, सचिन चिखले, बापु भालेकर तसेच महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर संगिता जोशी सर्व सामाजिक कार्यकर्ते व महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, नागरिक यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची व माझी वसुंधरेची सामूहिक हरित शपथ घेण्यात आली.
जल्लोष शिक्षणाचा २०२४’ या भव्य कार्यक्रमाचा शैक्षणिक सराव विविध उपक्रमांद्वारे महापालिकेच्या सर्व १२८ शाळांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सूरू आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रतिभा, सर्जनशीलता तसेच शिक्षकांचे प्रयत्न आणि नवकल्पना प्रदर्शित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
Discussion about this post