Pune News : पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे ते दानापूर आणि गोरखपूर मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
1. पुणे-दानापूर-पुणे (2 ट्रिप)
गाडी क्रमांक 01147 पुणे- दानापूर अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी पुण्याहून दिनांक 16.4.2024 रोजी 19.55 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता दानापूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01148 दानापूर – पुणे अनारक्षित उन्हाळी विशेष गाडी दानापूर येथून दिनांक 18.4.2024 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: एकूण 22 आयसीएफ कोच:
20 स्लीपर (अनारक्षित) आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन
2) पुणे-गोरखपूर-पुणे (2 ट्रिप)
गाडी क्रमांक 01151 पुणे- गोरखपूर पुण्याहून दिनांक 16.4.2024 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.50 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01152 गोरखपूर – पुणे विशेष गोरखपूरहून दिनांक 17.4.2024 रोजी 18.20 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुण्याला 06.40 वाजता पोहोचेल.
थांबे: हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
रचना: एकूण 22 आयसीएफ कोच: 1 फर्स्ट कम AC-2 टियर, 8 AC -3 टियर, 6 स्लीपर, 7 सामान्य द्वितीय श्रेणी सामानासह 2 गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर.
आरक्षण: गाडी क्रमांक 01151 साठी बुकिंग दिनांक 15.4.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.com वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Discussion about this post