व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-महाराणा प्रताप पुतळा समोर हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला त्या संदर्भात व्हीएसआरएस न्यूज चैनल ह्यांनीबातमी लावली. बातमी इफेक्ट झाले नंतर तिथले हाथगाडी यांचे काडुन स्व. मधुकर पवळे ब्रीजच्या खाली लावण्याची परवानगी देण्यात आले आहे.
फ क्षेत्रिय अधिकारी हातगाडी धारक दर महिन्याला मासिक हप्ता घेत आहे अशी म्हणून बातमी सचिन काळभोर यांच्या निवेदननुसार बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्याची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी घेऊन महाराणा प्रताप पुतळा समोरील अतिक्रमण कारवाई करुन कायमस्वरूपी हातगाडी ह्या ठिकाणी लावणे बंद करण्यात आले. तसेच महाराणा प्रताप पुतळा समोर फुटपाथ नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी खुला करण्यात आला .सचिन काळभोरयांचा प्रत्यंनाला यश आले आहे.
सदर हातगाडी धारक ह्यांचे मधुकर पवळे उड्डाणपूल खालील बाजूस पुनर्वसन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी हातगाडी धारक ह्यांना सुचना दिल्या आहेत.
जेष्ठ नागरिक महिला वर्ग शालेय विद्यार्थी तसेच निगडी येथील रहिवासी ह्यांनी महाराणा प्रताप पुतळा समोर फुटपाथ नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी खुला झाला म्हणून समाधान व्यक्त केले.
नागरिक यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त यांचे आभार मानले.
Discussion about this post