व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -अखंड भारतचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीरामांच्या जन्मतिथि निमित्त चिखली साने चौक भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व श्रीराम सेना समितीतर्फे या रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचा भाग म्हणूनच भगवान श्रीरामांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
रविवार, १० एप्रिल रोजी रामनवमीचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. विष्णूयागाने या कार्यक्रमाला सुरूवात होईल. दहा वाजेपर्यंत हा विष्णूयाग चाल णार आहे. अंबिका भवन येथे रामजन्मोत्सव पार पडेल. दुपारी १ वाजल्या पासुन महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.
Discussion about this post