व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पुणे जिल्हा न्यायालयीन कक्षेतील कोर्ट कामकाज दोन शिफ्ट मध्ये पूर्ववत सुरू करणे संदर्भात व वकिलांचे बार रूम खुल्या करणे कामी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हा पालक न्यायमूर्ती मा. ना. एस.पी. तावडे साहेब यांची मुंबई हायकोर्टात दिनांक ०४.०१.२०२१ रोजी पिंपरी चिंचवड अँड बार असोसिएशनचे शिष्टमंडळाने भेट घेतली व बैठकीत पुणे जिल्हा न्यायालयीन कक्षेतील कोर्ट कामकाज दोन शिफ्ट मध्ये सुरू करण्या संदर्भात चर्चा झाली.
पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशन ने यापूर्वी वेळोवेळी मे. हायकोर्ट, मुंबई व मे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांचेकडे तशी मागणी केली होती. सदर कामी वकील व पक्षकार यांच्या कोर्ट कामकाज पूर्ववत सूरू करणेबाबत असलेल्या तीव्र भावना मे. हायकोर्ट, मुंबई यांना पिंपरी बारचे वतीने पोहचविणे कामी प्रथम मुख्य न्यायमूर्ती मा.ना. दीपांकर दत्ता यांचे कार्यालयात पत्र देऊन जिल्हा पालक न्यायमूर्ती मा. ना. एस.पी. तावडे साहेब यांची मुंबई हायकोर्टात दिनांक ०४.०१.२०२१ रोजी पिंपरी चिंचवड अँड बार असोसिएशनचे शिष्टमंडळाने भेट घेऊन तसे पत्र दिले होते. तदनंतर मा.ना. न्यायमूर्ती, हायकोर्ट मुंबई व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सन्माननीय सदस्य यांचेमध्ये दिनांक ०५.०१.२०२० रोजी झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा न्यायालयीन कक्षेतील कोर्ट कामकाज दोन शिफ्ट मध्ये सुरू करणे संदर्भात झालेल्या चर्चेतून आज मे. हायकोर्टाने पुणे जिल्हा न्यायालयीन कक्षेतील कोर्ट कामकाज सकाळी ११ ते १.३० व दुपारी २.०० ते ४.३० या दोन शिफ्ट मध्ये सुरू करणेबाबत तसे आदेश पारित करून त्यासोबत दिनांक २७.११.२०२० रोजीचे मानक कार्यप्रणाली तील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेबाबत सांगितले आहे.
मा. ना. न्यायमूर्ती, हायकोर्ट मुंबई व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांचे पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे वतीने मनःपूर्वक आभार!
कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसल्याचे आपणा सर्वांना ज्ञात आहे. कोरोना पासून मुक्तिकडे वाटचाल करत असताना मे. ना. हायकोर्ट, मुंबई यांनी कोर्ट कामकाज विषयी घालून दिलेल्या मानक कार्यप्रणालीतील सूचनांचे कोर्ट कामकाजात पालन करणे यापुढेही गरजेचे आहे.