व्हीएसआरएस मराठी न्युज –माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणा आहेत.
देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.
मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडून लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करती अशी चर्चा राजकीय वर्तुळातून काही दिवसांपासून सुरू आहे. अखेर आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासी असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत असल्याचे देवरा यांनी म्हटले आहे.
आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आणले. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे, अशी पोस्ट देवरा यांनी एक्सवर केली आहे.
Discussion about this post