व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी (ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
साबळेवाडी(ता. खेड) येथे दि.२७ बुधवार रोजी दुपारी १ वाजता रतनताई चंद्रकांत काटकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी सरपंच रोहिणी साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका आरती गव्हाणे मॅडम यांनी काम पाहिले .यावेळेस ग्रामपंचायत सदस्य रायबा साबळे, सागर साबळे,नंदा काटकर,शीतल शेंडे,बबनराव काटकर उपस्थित होते.
उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल संध्याकाळी मिरवणूक ही काढण्यात आली होती.मिरवणुकीत गावातील देवस्थान ट्रस्ट,सहकारी सोसायटी पदाआधिकरी,ग्रामस्थ,नातेवाईक मंडळी उपस्थित होती.उपसरपंच पदी रतनताई चंद्रकांत काटकर यांची निवड झाल्याबद्दल साबळेवाडी ग्रामस्थ तसेच बहुळ, सिद्धेगव्हाण,शेलपिंपळ गाव येथील विविध मान्यवर पदाधिकारी त्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित होते.यावेळी उपस्थित असलेल्या शिरूर पं.उपसभापती सविताताई प-हाड यांनी शुभेच्छा देत सांगितले मा.शरदचंद्र पवार यांनी महिला आरक्षण संदर्भात महत्त्व पूर्ण कार्य केले.त्यामुळे महिलांना समाजात मान सन्मान वाढला. त्याबद्दल त्यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. साबळेवाडी(ता.खेड) या गावाची शीव ओलांडली की लगेच शिरूर तालुका सुरू होतो.खेड व शिरूर तालुक्यातील आपुलकीचे ऋणानुबंध स्पष्ट केले. गावातील राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाला महत्त्व देऊन साबळेवाडी गावचा विकास उपसरपंच नक्की करतील. यावेळेस त्यांनी सांगितले.
उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यावर रतनताई चंद्रकांत काटकर यांनी सांगितले ग्रामदैवत अंबिका मातेच्या कृपा आशिर्वादाने व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मला हे पद लाभले.राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन गावातील विकासकामांवर भर देऊन गावचा सर्वांगीण विकासासाठी योग्य अशी विकास कामे ,योग्य पद्धतीने केली जातील.सोशल मीडिया च्या माध्यमातून ,फोन द्वारे ,प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
त्यांची मी नेहमीचऋणी राहील.आमदार दिलीपअण्णा मोहिते पा. व जिल्हा अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांच्या वतीने ही त्यांना सत्कार समारंभात शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post