व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी चिंचवड येथील सामान्य नागरिकांना वापरण्याकरिता महापालिकेला विविध कंपनीकडून सीएसआर फंडातून मिळालेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स शहरात मागणीनुसार मोफत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कोविड- १९ साथरोगास प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी विविध उद्योजकांकडून CSR अंतर्गत महापालिकेस औषधे व्हेंटिलेटर यासह ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आले आहेत. काही दिवसापूर्वी सीएसआर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयात रुग्णालयांना निम्म्या दरात उपचार करण्याच्या अटीवरती देण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस में स्टार्क कंपनी, भोसरी, मे. युनायटेड वे, दिल्ली, एम.सी.सी.आय.ए., व सेव्ह द चिल्ड्रन ऑर्गनायझेशन यांचेकडून ७० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झालेले आहेत. तसेच कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सी.आय.आय.) यांचेकडून आणखी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स उपलब्ध होणार आहेत. सदर प्राप्त झालेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स वैद्यकीय सल्ल्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपलब्ध व्हावेत याकरिता सतिश इंगळे (कार्यकारी अभियंता, स्थापत्य) यांचे समन्वयक म्हणून नेमणूक करणेत येत आहे.
शहरातील नागरिकांनी मोफत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स/ मिळण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक ७७६८००५८८८ आहे. महापालिका हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांनी •ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मागणी केल्यास प्राप्त ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मधून नागरिकांचे घरी पोहोच करुन Install करुन देणे ही सुविधा मनपामार्फत पुरविण्यात येणार आहे. याकामी एक वैद्यकीय अधिकारी व तीन कर्मचारी मदत करणार आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.