व्हीएसआरएस न्युज पुणे- पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
संपुर्ण जगासाठी कोरोना लस पुरविणारी महत्त्वाची संस्था ठरत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील बीसीजी प्लान्ट इमारतीला दुपारी एकच्या सुमारास आग लागली आहे. कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली.
सीरम इन्स्टिट्युटमधील “आर-बीसीजी’ लस निर्मितीकरणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली असून कोरोनाच्या “कोवीशील्ड लस निर्मिती केंद्र त्यापासून दूर आहे. कोव्हिशिल्ड उत्पादन प्रकल्प पुर्णतः सुरक्षित आहे. तसेच दुपारी 4.10 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कूलिंगचे काम चालू आहे.