व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आांबेडकर पुतळ्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेत निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनासाठी पक्ष प्रवकते फजल शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष युवक प्रदेश रविकांत वर्पे, महीला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका सुलक्षणा शिलवत, स्वाती माई काटे, माई काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, संगीता जाधव, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, माऊली सुर्यवंशी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बंडातात्या कराडकर केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि आमच्या दोन्ही नेत्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात आणखी आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील दिला आहे.
Discussion about this post