पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर 50 लस उपलब्ध असणार आहे. कोव्हिशिल्ड आणि कोर्बेव्हॅक्स लस मात्र मिळणार नाही. वय वर्ष 14 आणि त्यापुढील सर्व नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला, दुसरा डोस तर, 18 वर्षावरील लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे.
ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने 50 टक्के तर, ऑनलाइन पद्धतीने 50 टक्के नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. वय वर्ष 12 ते 14 वयोगटातील मुलांना देण्यात येणारी कोर्बेव्हॅक्स लस, तसेच 18 वर्षावरील सर्वांना देण्यात येणार्या कोव्हिशिल्ड लसचादेखील सध्या तुटवडा आहे. सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत कोरोनाचे लसीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर गरोदर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
Discussion about this post